भक्ति प्रेमसुख नेणवे
197.
भक्ति प्रेमसुख नेणवे आणिका । पंडित वाचका ज्ञानियासी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी झाले जीवन्मुक्त । तरी भक्तिसुख दुर्लभ त्या ॥२॥
तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरिच हे वर्म पडे ठायी ॥३॥
भजन -
रमारमण हरिगोविंद । जयजय रमारमण हरिगोविंद ॥
