वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

ऐके तू ज्ञाना सुख वि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074248 · अभंग क्र. ५९२

592.
ऐके तू ज्ञाना सुख विश्रांति रूपा ।
हरिरूप दीपा पाहे ऐसा ॥१॥
चित्तवृत्तीचिया आदिमध्य अंती ।
रूपीरूप आनंदी समरसे ॥२॥
निवृत्ति सांगे ज्ञाना योगाची धारणा ।
जीवशीव करणा चक्षु दृढ करी ॥३॥

अर्थ :
हे सुखाच्या विश्रांति रूपा ज्ञानदेवा, सर्व ठिकाणी ज्ञानरूपाने परमात्मा भरला आहे असे तू पहा. चित्तवृत्तीच्या आरंभी व शेवटी एकरूपाने असणारा आनंदरूप हरीच आहे. त्याच्याशी तू समरस हो. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात हे ज्ञानदेवा योगाने साध्य होणारे जे जीवेश्वराचे एकत्व त्याचे साधन जे ज्ञान ते तू आपल्या चित्तामध्ये दृढ संपादन कर. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग