वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

जे ब्रह्मी पाहता मन

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074280 · अभंग क्र. ७६०

760.
जे ब्रह्मी पाहता मन न सिरे कोठे ।
ऐसियाचे पेठे मज उभे केले ॥१॥
नावाडा श्रीरंगु जाहला हळुवारू ।
तेणे पावविला पारू ब्रह्मविद्येचा ॥२॥
श्रीगुरूवीण सर्व शून्य हेचि मी जाणे ।
तेथिचिये खुणे निवृत्तिराजु ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठली अनुसंधान ।
रात्रिदिन लीन ब्रह्मस्थिति ॥४॥

अर्थ :
ज्या परब्रह्माच्या स्वरूपाविषयी विचार केला तर मन अन्यत्र कोठेही जात नाही. अशा परमात्म स्वरूपाच्या पेठेत मला नेऊन उभे केले. त्या पेठेत जाण्याला संसार समुद्र फार मोठा आहे. खरा तथापि भगवान जो श्रीरंग हा नावाडी होऊन त्याने मला हलकेच यत्किंचितही धक्का लागु न देता ब्रह्मविद्येचा पार प्राप्त करून दिला. हे सर्व उपकार श्रीगुरूचे असल्यामुळे त्या श्रीगुरूवांचून मी सर्व शून्य समजतो. कारण तेथील खूण प्राप्त करून देणारे श्रीगुरूनिवृत्तिराजच आहेत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या ठिकाणी अनुसंधान ठेऊन रात्रंदिवस ब्रह्मस्थितिमध्ये लीन करून ठेवणाऱ्या श्रीगुरूंचे काय उपकार सांगावे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग