वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

काय एका जाले ते का न

🙏 3. संत तुकाराम · ABH-079327 · अभंग क्र. १००३

1003.
काय एका जाले ते का नाही ठावे । काय हे सांगावे काय म्हुण ॥१॥
देखतील डोळा ऐकती कानी । बोलिले पुराणी ते ही ठावे ॥धृपद॥
काय हे शरीर साच की जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥
का हे कळो नये आपुले आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥
का हे आवडले प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आले ॥४॥
का हे जन्म वाया घातले उत्तम । का हे रामराम न म्हणती ॥५॥
काय भुली यांसी पडली जाणता । देखती मरता आणिकासी ॥६॥
काय करिती हे बांधलिया काळे । तुका म्हणे बळे वज्रपाशी ॥७॥

अर्थ :
या संसाराची संगती करून एकेकाची काय दुर्दशा झाली आहे हे लोकांना ठाऊक नाही काय ? या लोकांना काय काय म्हणून समजून सांगावे ? या संसाराची दुर्दशा हे डोळ्यांनी पाहतात कानाने ऐकतात आणि पुराणात काय सांगितले आहे हे ही त्यांना माहीत आहे. हे शरीर खरे आहे की जाणार आहे हेही सगळ्यांना माहीत आहे. आपले स्वहित कशात आहे हे सगळ्यांना का बरे करू नये आणि बालक व तारुण्य वृद्धावस्था यामध्ये किती दोष आहेत हेही सर्वाना माहीत आहे. आप्तइष्ट हे यांना इतके का आवडले आहेत अखेरीस कोणी कोणाच्या कामाला आले आहे काय ? हा उत्तम असा जन्म या लोकांनी का बरे वाया घातला आहे का बरे हे लोक राम राम म्हणत नाहीत ? कित्येक लोक मरताना हे पाहत असतात तरीही या लोकांना या संसाराच्या शाश्वत पानाचा भ्रम पडलेला का आहे ? तुकाराम महाराज म्हणतात काळाने आपल्या बलाने या लोकांना वज्रपशाशी बांधले तर हे लोक काय करतील. त्यामुळे नेहमी हरिभजन करावे असे महाराज सांगतात व हरिभजन केल्यानेच आपण तरू शकतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग