मृतिकाभक्षण
मृतिकाभक्षण
मुले सांगताती । माती खातो गे श्रीपती ॥१॥
लांकूड घेऊनि हातांत । माती खातो का पुसत ॥२॥
भावा भुललासे खरा । कांपतसे थरथरा ॥३॥
मुख दावी उघडोनी । पाहे ह्मणे चक्रपाणी ॥४॥
ब्रह्मांडे देखिली । नामा ह्मणे वेडी झाली ॥५॥