सर्वांभूती पाहे एक व
853.
सर्वांभूती पाहे एक वासुदेव | पुसोनिया ठाव अहंतेचा ॥१॥
तोचि संतसाधु ओळखावा निका | येर ते ऐका मायाबद्ध ॥२॥
देखिलिया धन मृत्तिकेसमान | नवविधा रत्ने जैसे धोंडे ॥३॥
काम क्रोध दोघे घातले बाहेरी | शांति क्षमा घरी राबवित ॥४॥
नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे | विसंबेना त्याचे क्षणमात्र ॥५॥
