माझे मनी ऐसे होते आत
1431.
माझे मनी ऐसे होते आता देवा | भाव समर्पावा तुझे चरणी ॥१॥
तंब मायामोहे मजसी केला हेवा | लोटियेले भवजळामाजी ॥२॥
आशानदी पुरी वाहविली वेगी | काढी मज हरी कृपाळुवा ॥३॥
सरितेमाणी धरिलो या मदनमगरे | पुढारे माघारे जाऊ नेदी ॥४॥
॥थडिये उभा उभी धांवगा श्रीहरी | मज हानी थोरी सर्वस्वे गेलो ॥५॥
भक्ति नवरत्नांची बुडाली वाखोरी काढी वेगी हरी मायबापा ॥६॥
धीर आणि विचार ह्या दोन्ही सांगडी श्रद्धा दोरी पुढील तुटोनि गेली ॥७॥
भावबळे सांपडलो दाटलो उभडी | वेगी घाली उडी कृपाळुवा ॥८॥
तुझे भक्तिविण कोरडा होय गळा | नेतो रसातळा क्रोध मीन ॥९॥
नामा म्हणे तुझा मी सकळ जीवा | तरी हा काढावा शरणांगत ॥१०॥
