नावडे प्रपंच तापत्रय
1432.
नावडे प्रपंच तापत्रय माया | येई धांवोनिया केशिराजा ॥१॥
भवभये फार भ्यालो जन्मांतरा | चौन्यांशींचा फेरा बुडवितो ॥२॥
सत्कथा श्रवण नाम संकीर्तन | न घडे भजन मज देवा ॥३॥
नवविधा भक्ति कवणे केली कैसी नामा म्हणे ऐसी दावी माते ॥४॥
