वैकुंठा जावया तपाचे
214.
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणे जीवा नाश करणे बहु ॥१॥
तया पुंडलिके केला उपकार । फेडावया भार पृथ्वीचा ॥२॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥
अर्थ :
पूर्वी लोकास वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्यासारखे कष्ट करावे लगत असत; त्यामध्ये जीवही गमवावा लगत असे. पण भक्त पुंडलिकाने भक्तांवर मोठा उपकार केला आहे; त्याने दाखविलेल्या भक्तीमार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार कमी झाला. तुकाराम महाराज म्हणतात, की वैकुंठाची अवघड पायवाट सोपी झाली आहे, ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वीतलावर वैकुंठ आले आहे..
