अच्युता अनंता श्रीधर
469.
अच्युता अनंता श्रीधरा माधवा | देवा आदिदेवा पांडुरंगा ॥१॥
कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना | तूंचि नारायणा नामधारी ॥२॥
मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा | नाम सदाशिवा शांतरूपा ॥३॥
रूपातीत हरी दाखवी सगुण | निरंतर ध्यान करी नामा ॥४॥
