तुझिया सत्तेने वेदास
468.
तुझिया सत्तेने वेदासी बोलणे | सूर्यासी चालणे तुझिया बळे ॥१॥
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी | वर्म हे जाणूनि शरण आलो ॥२॥
मेघांनी वर्षावे पर्वती बैसावे | वायूने विचरावे सत्ते तुझे ॥३॥
नामा म्हणे काडी न हाले साचार | प्रभू तू निर्धार पांडुरंगा ॥४॥
सर्वही भूतांचे पृथ्वी ओझे धरी | विरे पाण्यावरी आज्ञा तुझी ॥५॥
आकाश पोकळ भुता ग्रासे काळ | जेव्हा देसी बळ तुझे तया ॥६॥
