वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १२. देवाची स्तुति

श्रीकृष्ण विचरे कुंज

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089386 · अभंग क्र. ५३६

536.
श्रीकृष्ण विचरे कुंजवनी ।
तैसाचि दंडकरण्यी श्रीराम ॥१॥
एके वधिले खरदूषण ।
एके मर्दन कागबगा ॥२॥
नासिक छेदने शूर्पणखा ।
येणे पूतना देखा शोषियेली ॥३॥
निळा म्हणे चरित्रमाला ।
रचिली स्वलीला रामकृष्णे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग