संत गाती सनकादिक ।
535.
संत गाती सनकादिक ।
तुमचिये कौतुक कीर्तिचे ॥१॥
तारिल्या शिळा गिळीला वन्ही ।
पर्वत उचलूनि धरिला वरी ॥२॥
सागर सारुनी व्दारकापुरी ।
वसविली नगरी उदकांत ॥३॥
निळा म्हणे गोवळवत्से ।
झाला निज इच्छे क्षणमात्रे ॥४॥
535.
संत गाती सनकादिक ।
तुमचिये कौतुक कीर्तिचे ॥१॥
तारिल्या शिळा गिळीला वन्ही ।
पर्वत उचलूनि धरिला वरी ॥२॥
सागर सारुनी व्दारकापुरी ।
वसविली नगरी उदकांत ॥३॥
निळा म्हणे गोवळवत्से ।
झाला निज इच्छे क्षणमात्रे ॥४॥