वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

मी देही म्हणता ब्रह्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074488 · अभंग क्र. ५३९

539.
मी देही म्हणता ब्रह्महत्त्या कोटी ।
येऊनिया पाठी थापटिती ॥१॥
शुद्ध ब्रह्मी कैशी कल्पना आरोपी ।
तोचि एक पापी जगी होय ॥२॥
नाथिले अज्ञान करून अनंता ।
केवी मोक्षपंथा जाईलजे पा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे दिव्य मी देईन ।
सद्गुरूची आण स्वयंब्रह्म ॥४॥

अर्थ :
मी देह आहे असे म्हटले असता लागलीच कोट्यवधी ब्रह्महत्त्या येऊन तुला शाबासकी देतील. अरे वेड्या, शुद्ध ब्रह्माच्याठिकाणी देह काय, पाप काय, इत्यादिकांचा कसला आरोप करतोस. असा आरोप करणारा तो जगात एक पापी आहे असे समज. परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान नसताना त्या परमात्म्याच्या ठिकाणी जो अज्ञान मानतो तो मोक्षमार्गाला प्राप्त कसा होईल. या सत्यगोष्टीच्या खात्री करता मी वाटेल ते दिव्य करण्यास तयार आहे. श्रीगुरूची शपथ वाहून सांगतो की जीव स्वतः ब्रह्मरूपच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग