तुझे भक्तिसुख द्यावे
1754.
तुझे भक्तिसुख द्यावे मज प्रेम | वसो तुझे नाम माझे मुखी ॥१॥
सद्भक्ति विचार वाही माझे चित्ती | हेचि कृपामूर्ति द्यावे मज ॥२॥
पदर पसरला न निघे गाभारा | विठोबा दातारा घावे आता ॥३॥
नामा म्हणे देवा इतुके द्यावे मज | ऐकोनि केशवराज काय बोले ॥४॥
