वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

लटिकी ग्वाही सभेआत ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080903 · अभंग क्र. ३२५०

3250.
लटिकी ग्वाही सभेआत । देता पतित आगळा ॥१॥
कुंभपाकी वस्ती करू । होय धुरु कुळेसी ॥धृपद॥
रजस्वला रुधिर स्रवे । तेचि घ्यावे तृषेसी ॥२॥
तुका म्हणे जन्मा आला । काळ झाला कुळासी ॥३॥

अर्थ :
धर्मसभेमध्ये जो खोटी ग्वाही देतो साक्ष देतो तो सर्वांपेक्षा वेगळा पतित असतो. तो पापी सर्व पाप्यांच्या कुळामधील सर्वश्रेष्ठ पापी असतो त्यामुळे त्याला घोर अशा कुंभीपाक नरकामध्ये राहण्यास जागा मिळते. ज्यावेळी अशा पापी मनुष्याला कुंभीपाक नरकामध्ये तहान लागेल त्यावेळी रजास्वाला महिन्यातून चार दिवस बाजूला असलेल्या स्त्रीचे स्त्रवणारे जे रुधीर आहे ते पिण्यास देऊ असे यम म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, असा पतित कुळामध्ये जन्माला येऊन सर्व कुळाचा काळच झालेला असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग