वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 213. कूट

मेले जित्यासी सांगे

🙏 4. संत नामदेव · ABH-082184 · अभंग क्र. २१२९

2129.
मेले जित्यासी सांगे गोष्टी | आंधळे ओवी सुवर्णाच्या गांठी |पांगुळ लागे पवनाच्या पाठी | बाळका पोटी माय वाढे ॥१॥
थोट्याने धवळार रचियेले | मुके पुराण सांगू बेसले |सवेंचि बहिरे एंको ठेळे | वेडे हासले बाहाणियासी ॥२॥
आणिक एक नवळ सांगू काई | जीत वाघ शलभाने भक्षिला पाही |मुंगीने पवत उचलिला बाही | माशी करी छाया सूर्यासी पे ॥३॥
मुदंगे वाहिला गुरव राणा | वांझेच्या स्तनी संचरला पान्हा |माया फुले खोऊ नाचे दवणा | जाण सुजाणा न कळेची ॥४॥
मुरकुटे सगळा सागर गिळिला | माशाने पारधी मारिला |सशाने सिंह भोवंडिला | वेदांपुराणा न कळेची ॥५॥
हे तुम्ही म्हणाल उमाने | हे तंव उरफाटे दृष्टी पाहाणे |विष्णुदास नामा म्हणे | अनुभवी या खुणा जाणती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग