प्रळयांचे काळी ब्रह्
2128.
प्रळयांचे काळी ब्रह्मांड जळाळे | कोणे त्यांत उरले सांगा मज |॥१॥
प्रभा ते फांकली जाती ते गुंतली | सांग मज खोली स्वरूपाची ॥२॥
ब्रह्मांडाची जेव्हा राख जळून जाली | कोणी ती लावली अरुपरूपी ॥३॥
विष्णुदास नामा म्हणे सांगा हेंचि गूढ | नाही तरी मूढ होऊंनि राहे ॥४॥
