त्रिकाल आरती करू देव
532.
त्रिकाल आरती करू देवाधिदेवा ।
गाऊ नाचू नित्य कथा करू केशवा॥धृ॥
दिननिसी छंद लागो हाचि मानस ।
रामा रामा कृष्णा गाऊ गीतेसी ॥१॥
सारासार विचार करू नित्य विवेक ।
तत्त्वमसि गुरूमुख पाहू सकळीख ॥२॥
संतसंग करू आम्ही भावार्थबळे ।
बहेणि म्हणे येणे तुटती जन्म-मुळे ॥३॥
