महारीण ३९०० ते ३९०९
3900.
महारीण ३९०० ते ३९०९
महारीण हिंडे गांवांत । पाटीलबावाआहेत झोपेत । महारीण बहुती फिरत । पाटीलझोपेत झाले मस्त ॥१॥ मायबाप जोहार । मीसांगतें ते ऐका साचार । तुमची नगरी करा हुषार । आता येतील यमाजी हुद्देदार ॥२॥ झोंप सांडाआतां उठा उठी । पुढे आली यमाजीची चिठ्ठी । जाब देता व्हाल हिंपुटी । मारील गांडीवरी जेव्हांकाठी ॥३॥ मायबापाचें न चाले कांही । भाऊबहीणी राहाती ठायींच्या ठायी । सेजेची बायकोपुसेना कांही । इष्ट मित्र कोणाचे भाई ॥४॥ जोवरीतुमचे हाती आहे । तोवरी कराल ते होय । आयुष्यसरल्या कराल काय । भोयीन टेकती पाय ॥५॥ __ म्हणोनी येते काकुलती । धरा धरा सत्संगतीं । तेणे होईल तुम्हा विश्रांती । एका जनार्दनी करीलविनंती ॥६॥
