॥ संत सोयराबाई ॥
1.
॥ संत सोयराबाई ॥
संत सोयराबाई अभंग गाथा
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥
मी तू पण गेले वाया । पाहता पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचे ते काम । पळोनी गेले क्रोध काम ॥३॥
देही असुनी तू विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥४॥
पाहते पाहणे गेले दूरी । म्हणे चोख्याची महारी ॥५॥
