देहबुद्धि सांडीं कल्
3226.
देहबुद्धि सांडीं कल्पना दंडी । वासनेची शेंडी वाढवूं नको ॥१॥
तू ते तूंचि पाही तू ते पाही । पाहूनिया राही जेथीच्या तेथे ॥२॥
तू ते तूंचि पाही जेथे देहो नाही । मीपणे का वाया गुंतलासी ॥३॥
एका जनार्दनी मीपण तूंपण । नाही नाही मज तुझीच आण ॥४॥
