वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 9. जनाबाई निश्चय

नामयाचे ठेवणे जनीस ल

🙏 16. संत जनाबाई · ABH-073954 · अभंग क्र. २२३

223.
नामयाचे ठेवणे जनीस लाधले । धन सांपडले विटेवरी ॥1॥
धन्य माझा जन्म धन्य माझा वंश । धन्य विष्‍णुदास स्वामी माझा ॥2॥
कामधाम माझे विठोबाचे पाय । दिवसनिशी पाहे हारपली ॥3॥
माझ्या वडिलांचे दैवत तोहा पंढरिनाथ । तेणे माझा अर्थ पुरविला ॥4॥
संसारीचे सुख नेघे माझे चित्ती । तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ॥5॥
नामयाचे जनी आनंद पै झाला । ह्रुदयी बिंबला पांडुरंग ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग