वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

कार्तिकी एकादशी| पोह

🙏 4. संत नामदेव · ABH-083011 · अभंग क्र. ४२४

424.
कार्तिकी एकादशी| पोहा मिळाला पंढरीसी |तेथील महिमा वर्णू कैसी | ब्रह्मांदिका न वर्णवे ॥१॥
दिड्या गरुडटक्याच भार| मृदंग वाजती अपार|वैष्णव नाचती जयजयकार| नादे अंबल गर्जतसे॥२॥
उपजोनिया संसारी | वेळोवेळा पाहे रे पंढरी|विठ्ठलराज भीमातीरी | वाट पाहे भक्तांची ॥३॥
कल्तरू चिंतामणी | घरी कामधेनूची दुभणी |मोतियांचे चौक राजांगणी | वृंदावने शोभती॥४॥
संत बैसले पद्मासनी | राया विठ्ठला तुझे चरणध्यानी |हरिकीर्तन ऐकोनी कानी | अंतःकरणी निवाले ॥५॥
जे जे चिंतन मानसी | ते फळ पिवले अहर्निशी |मुक्ति देऊनि तयासी | आढळपदी बैसविलें॥६॥
सकळ तीर्थे मध्यान्हकाळी| येती चंद्रभागेजवळीं|विमाने येती अंतराळी | देव स्नाने करीताती॥७॥
धन्य धन्य ऐसे चंद्रभागा तीर्थ | तेथे चतुर्भुज होती प्राणिमात्र |ऐसे आणिक नाही क्षेत्र| भूवैकुंठ पंढरी ॥८॥
मणिकर्णी वैतरणीं|स्ना न करिजेती अंतःकरणीं|लीन होईल विठ्ठल चरणी | पापधुणी होईल ॥९॥
अनंत जन्मांचा उपाव| नामया स्वामी पंढरीराव |देईल वैकुंठी ठाव| पुनर्जन्म चुकविल ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग