जयाच्या चरणा मिठी घा
1763.
जयाच्या चरणा मिठी घाली भावे । धन्य ते जाणावे सदैव संत ॥१॥
प्रेमाचे सागर भक्तीचे उदधी । तोडिला उपाधी नाममात्रें ॥२॥
जडजीवा तारक सत्य सत्य वाचे । आणीक ते न वचे उपमे त्याच्या ॥३॥
एका जनार्दनी कृपाळु संतजन । तेणे मज पावन केले जगी ॥४॥
