जप तपें तपता कोटी ।
377.
जप तपें तपता कोटी । होती हिंपुटी भाग्यहीन ॥१॥
तया विश्रांतीसी स्थान । पंढरी जाण भुमंडली ॥२॥
योगयाग धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ॥३॥
तो उभा कटी कर ठेवुनी । समचरणीं विटेवरी ॥४॥
एका जनार्दनी पाहातां । दिठी कंदर्प कोटी वोवाळिजे ॥५॥
