वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

माथा ठेवोनिया पाव ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084693 · अभंग क्र. १८५१

1851.
माथा ठेवोनिया पाव । माझा देहींच केला दीव ॥१॥
नवलाव पायाचा मी केला । माझा देहींचे देवपणा नेला ॥२॥
पायींपराक्रम पंचानन । पायी निरसला देह अभिमान ॥३॥
पायी देहासी पाहे ठावो । पायी देहचि केला वावो ॥४॥
नवल पायाचा हा भावों । पायी निरेचि देही देवो ॥५॥
एका जनार्दनाच्या पायी । देह विदेह दोन्ही नाही ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग