अभिनव सांगता विस्मयो
1852.
अभिनव सांगता विस्मयो दाटला । देहींच भासला देव माझ्या ॥१॥
नवल कृपेंचें विंदान कैसे । जनार्दने सरसे केले मज ॥२॥
साधनाची आटी न करिता गोष्टी । हृदयसंपुष्टीं दाविला देव ॥३॥
एका जनार्दनी एकपणे शरण । नवळे महिमान कांहींमज ॥४॥