ऐसे तीर्थ कोणी दाखवा
431.
ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुलभ |जेथे समारंभ हरिकथेचा ॥१॥
ते एक पंढरी विख्यात त्रिभुवनी |सकळा शिरोमणी चंद्रभागा ॥२॥
से तीर्थ कोणी दाखवा सुखरूप |जेथे त्रिविध ताप हारपती ॥३॥
ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुंदर |गरुडटकभार विराजती ॥४॥
ऐसे तीर्थ कोणी दाखवा निर्मळ |जास्त थे नाही से मळ दुष्टबुद्धि ॥५॥
नामा म्हणे संतजनांचे माहेर |गाता मनोहर गोड वाटे ॥६॥
