(मंबाजी गोसव्याने मा
3451.
(मंबाजी गोसव्याने मारले त्यासमयीचे अभंग)
सोडवा सोडवा सोडवा अनंता । तुजविण ऐसा कोण दुजा प्राणदाता ॥१॥
कोणा लाज नेणा ऐसे । आणिका शरण आम्ही जाता ॥२॥
तुका म्हणे सखया । माझ्या रखुमाईच्या कांता ॥३॥
अर्थ :
अनंता, मला दुःखातुन, यातनांमधुन सोडवा हो, सोंडवा. तुमच्या शिवाय दूसरा प्राणदाता कोण आहे ?. तुम्हाला टाकून आम्ही इतरांना शरण गेलो, तर कोणाला लाज वाटणार बरे ?. (यासाठी) तुकाराम महाराज म्हणतात, हे सख्या, रुक्मिनिकांता, मला या जाचातुन सोडव.
