वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 129. हुंबरी

हुंबरी

🙏 4. संत नामदेव · ABH-082952 · अभंग क्र. २९०

290.
हुंबरी

समस्त मिळोनि गोपाळी | तया यमुनेच्या पाबळी |कृष्णे मांडिली धुमाळी | कळंबातळी आनंद ॥१॥
वळुनि कांबळ्या वेटी | त्याही बांधिल्या मनगटी |विवाद मांडिला निकटी | धूर्जटी कान्होसी ॥२॥
आता कृष्णा कवणे ठायी | जासी तुजवरी आली डाई |आमची हमामा हुंबरी देई | उभा राहे पै का गा ॥३॥
कृष्ण म्हणे मी एकवटु | तुम्ही आम्ही गडी वाटू |गोवळी घातलासे हाटु | अति निकट कान्हूसी ॥४॥
म्हणे बळीराम पहागा | बोल नव्हे तुम्हाजोगा |तुम्ही समर्थ श्रीरंगा | आम्हा कांगा भेटविसी ॥५|
ऐसा सकळी मान केला | तेव्हा कृष्ण संतोषला |आनंद चित्तासी पावला | म्हणे भला भला नाम्या ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग