कासया करू तपाचे डोंग
118.
कासया करू तपाचे डोंगर । आणिक अपार व्रतदान ॥१॥
कासया जाऊ दूर दिगंतरी । राहीन पंढरी पशुयाती ॥२॥
कासया उपवास निराहार पारणे । संत संग पेणे जन्मोजन्मी ॥३॥
कासया विविनिषेधाची मात । सुखाचा सांगात तुमचा माझा ॥४॥
कासया भ्रमण देश तीर्थाटणी । सेवीन पायवाणी संता घरी ॥५॥
कासया करावे पंचाग्नि साधनउच्छिष्ट भक्षीन संताद्वारी ॥६॥
चोखा म्हणे सुख येईल घरासी । जाईन संतांसी शरण देवा ॥७॥
