वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

सुखाची वस्ती झाली मा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080866 · अभंग क्र. ३३७१

3371.
सुखाची वस्ती झाली माझे जीवी । तुमच्या गोसावी कृपादाने ॥१॥
रूप वेळावेळा आठवी अंतरी । बैसोनि जिव्हारी राहिले ते ॥धृपद॥
विसावले मन विठ्ठले प्रपंचा । गोडावली वाचा येणे रसे ॥२॥
तुका म्हणे काही नाठवेसे झाले । दुसरे विठ्ठले मज आता ॥३॥

अर्थ :
हे माझ्या स्वामी तुमच्या कृपादानामुळेच माझ्या जीवामध्ये सुखाची वस्ती झाली आहे. देवा तुझे रुप माझ्या अंत:करणामध्ये अगदी ठासून बसले आहे आणि तेच मी वेळोवेळा आठवित आहे. देवा तुझ्या नामरसाने माझी वाचा गोडावली आहे आणि माझे मन प्रपंचाला विटले आहे व ते मन तुझ्याच ठिकाणी विश्रांत पावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठाई मला तुझ्यावाचून आता दुसरे काहीही आठवेनासे झाले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग