वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

म्हणती ज्याते परात्प

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088527 · अभंग क्र. ४४२

442.
म्हणती ज्याते परात्पर ।
तो हा उभा कटी कर ॥१॥
रुपे गोजिरा सगुण ।
अवलोकिता निवे मन ॥२॥
मुगुट कुंडले मेखळा ।
कासे मिरवे सोनसळा ॥३॥
निळा म्हणे संतभेटी ।
उतावेळ सदा पोटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग