मन मारुनिया मुक्त पै
767.
मन मारुनिया मुक्त पै केले ।
मीपण माझे नेले हिरोनिया ॥१॥
मज लाविला चाळा लाविला चाळा ।
विठ्ठलुचि डोळा बैसलासे ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु लाघवी भला ॥
आपरुपी मज केला सौरसु ॥३॥
अर्थ :
त्या परमात्म्याने माझ्या मनाचा निश्चय करून मला मुक्त केले. माझी देहादि पदार्थाच्या ठिकाणी असलेली मी व माझे अशी सत्यबुद्धी हिसकावून घेतली. व आपण माझ्या चित्तांत व डोळ्यांत बसून आपल्या स्वरुपाचा चाळा लावला. आणि आपल्या स्वरुपामध्ये एकरुप करुन मला सुखी केले असा हे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल लाघवी आहेत असे माऊली सांगतात.
