वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

अगाधपण माझे अंगी बाण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074254 · अभंग क्र. ७६८

768.
अगाधपण माझे अंगी बाणले ।
वरपडे देखिले मृत्तिकालिंग ॥१॥
त्यासी चैतन्य नाही गुण नाही ।
चळण नाही गुण रुप नाही ॥२॥
माझ्या शरीरी जोतिर्लिंग उगवले ।
अगाध कवळिले हस्तेवीण ॥३॥
बापरखुमादेविवरु जोतिर्लिंग विश्वनाथ ।
तेणे माझा मनोरथ पुरविला गे माये ॥४॥

अर्थ :
माझ्या ठिकाणचा परिछिन्न देहात्मभाव होता तो नाहीसा होऊन मृतिकालिंग म्हणजे परमात्मस्वरुप मला प्राप्त झाले. त्या परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी ज्ञान, गुण, चलन, रुप हे काही नाही. अशा तहेचे ते ज्योतिर्लिंग माझ्या शरीरांत म्हणजे हृदयांतच प्रगट झाले. असे ते अगाध ज्योतिर्लिंग त्यास मी हातावाचून स्वाधीन करुन घेतले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच जोतिर्लिंग म्हणजे विश्वनाथ होय व त्यांनी माझे सर्व मनोरथ पूर्ण केले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग