वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 184. आत्म सुखप्राप्ती विषयी अर्थ उद्गार

तुज नेणो गा महेशा |

🙏 4. संत नामदेव · ABH-082394 · अभंग क्र. १४२०

1420.
तुज नेणो गा महेशा | म्हणुनि आलो गर्भवासा |अंधकूपी पड़िला जैसा| रात्रिदिवसा तो नेणो ॥१॥
तुझिया नामाची सांगडी | देई ते न खंडी |पावेन मी पैलथडी | त्या सांगडी आधारे ॥२॥
कामक्रोधादि जलचरीं| कासाविस जालो भारी |व्याकुळ होय चितालहरी | दुःखे भारी दाटलो ॥३॥
कल्पना वेली गुंडाळली पायी | तेणे बुडे विषयडोही |भवते पाहे तंव कोण्हे नाही | मग तुज ध्यायी विश्वेशा ॥४॥
मज बांधुनी कर्मदोरी | घातले संसार दुर्धरी |मायानदीचा महापुरी | वाहावलो गा दातारा ॥५॥
ऐसा खेदखिन जालो बहुवस | न देखे विश्रांतीची वास |विनवी नामा विष्णुदास | गर्भवास पुरे आता ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग