वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 184. आत्म सुखप्राप्ती विषयी अर्थ उद्गार

मज चालता आयुष्यपंथे

🙏 4. संत नामदेव · ABH-082388 · अभंग क्र. १४१९

1419.
मज चालता आयुष्यपंथे | तारुण्यवन पातले तेथे |मदमछरादि श्वापदे बहुते | आली कळकळीत मजपाशी ॥१॥
ती धांवती पाठोपाठी | पाहे तंव विषयाचे घाटी |काम क्रोध व्याघ्रांची दाटी | देखोनि पोटी रिघाले भय ॥२॥
मग स्वधर्ममार्गी रिघालो | तंव अहंकारतस्करे आकळिलो |राहे राहे म्हणोनि उभा केलो | तेणे शितरलो स्वामिया ॥३॥
जब क्षण एक उघडिले डोळे | पाहे तंव कंठ दाटला व्याळे |मायमोहसर्पी डंखिले | त्यांचिये गरळे झळंबलो ॥४॥
जंव न पवे शेवटील लहरी | तंव धांव धांव उपाव करी |विष्णुदास नामा धांवा "करी | माझा कैवारी केशिराजु ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग