वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

माझे माहेर पंढरी । आ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087324 · अभंग क्र. ४३४

434.
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥१॥
बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलिक बंधु आहे । त्यांची ख्याती सांगु काय ॥३॥
माझी बहिण चंद्रभागा । करितसे पापभंगा ॥४॥
एका जनर्दनी शरण । करी माहेरीची आठवण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग