कृष्णा माझी माता कृष
31.
कृष्णा माझी माता कृष्णा माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारु । उतरी पैल पारु भवनदी ॥२॥
कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥
