अपत्याचे परी सांभाळि
1762.
अपत्याचे परी सांभाळिले श्रीहरी | वाट निरंतरी पाहतु असे ॥१॥
संवसारी कष्ट जालेती बहूभारी | मज निववी हरी मायबापा ॥२॥
गांव ते पंढरी भिवरेच्या तीरी | निरोप माहेरी सांगिजो का ॥३॥
क्षीरसागराभीतरी पहुडले श्रीहरी | कवण धांवा करी कुमारीचा ॥४॥
पुंडलिकाची भक्ति मांडली चराचरी | गुढिया निरंतरी उभविल्या ॥५॥
संत सनकादिक ते माझे सज्जन | द्वारी असे वाहन गरुडाचे ॥६॥
रखमाई माता विठो माझा पिता | नामा म्हणे संता भेटावया ॥७॥
