वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

शून्य निरसुनी दोन्ही

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074479 · अभंग क्र. ५२९

529.
शून्य निरसुनी दोन्ही निरखिले ।
तेथुनी देखिले निजवस्तु ॥१॥
स्वप्रकाशमय आत्मा सदोदित ।
सर्वत्र भरीत एकमेव ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान तिन्ही निरसुनी ।
झालो निरंजनी लीन आथी ॥३॥
अह हे स्वरुप गिळूनिया पाही ।
देहींच ही स्वसंवेद्य ॥४॥
बापरखुमादेविवर विठ्ठलाचा दास ।
झाला समरस परब्रह्म ॥५॥

अर्थ :
सत्ता स्फूरतिशून्य असलेले अहम्'आणि 'मम' यांचा निरास करुन निरखून पाहिले तेव्हा निजवस्तूला पाहिले. पुढे त्यांचा निरास झाल्यामुळे ब्रह्मस्वरूप कळले, तेच तेजोमय ब्रह्म आत्मा' या संज्ञेने प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भरलेले आहे. असे ज्ञान झाले. नंतर ध्याता ध्यान व ध्येयही त्रिपुटी निरसून मी आत्मरुप बनलो. अहंकार टाकून या देहातच मी विदेह स्वरुपाने स्वसंवेद्य आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगांचा दास जो मी, तो ब्रह्मस्वरुपासी समरस झालो. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग