ऐका ऐका वचन माझे । त
702.
ऐका ऐका वचन माझे । तुम्ही वदा विठ्ठलवाचें ॥१॥
नामापरतें साधन नाही । वेदशास्त्रे देती ग्वाहीं ॥२॥
चार वेद सहा शास्त्र । अवघ नामाचा पसर ॥३॥
अठरा पुराणांचे पोटी । नामेंविण नाही गोष्टी ॥४॥
नामे तारिले पातकी । मुक्त झाले इहलोंकी ॥५॥
अजामेळ तारिला । वाल्हा कोळी ऋषी केला ॥६॥
गणिका नेली निजपदा । रमनाम वादे एकदां ॥७॥
ऐसी नामजी ती थोरी । पुतना तारिली निर्धरी ॥८॥
आवडीने नाम गाय । एका जनार्दनी वंदी पाय ॥९॥
