वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

भक्त भागवत बहुसाल ऐक

🙏 4. संत नामदेव · ABH-081619 · अभंग क्र. ९२९

929.
भक्त भागवत बहुसाल ऐकिले | बहु होऊनि गेले होती पुढे ॥१॥
परि नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व | हा रस अद्भुत निरूपमु ॥२॥
हे सुखविश्रांति नाही हो कल्पांती | विचारावे संती दूरदृष्टि ॥३॥
होतू शास्त्रवक्ते व्युत्पत्तीचे माथे | होतू बहु श्रोते बुद्धिवंत ॥४॥
होतू कर्मनिष्ठ विधीचे उद्भट | होतू सर्वश्रेष्ठ पूज्य लोका ॥५॥
होतू कलावंत कवित्व कुशल | होतू का वाचाळ चतुरतेचे ॥६॥
होतू का पाठक होतू का साधक | होतू का वाचक ग्रंथकार ॥७॥
होतू आत्मज्ञानी होतू निजध्यानी | होतू वज्रासनी बैसकेचे ॥८॥
होतू योगयुक्त होतू जीवन्मुक्त | होतू का विरक्त सर्व संगी ॥९॥
ऐसे होतू का सभाग्य संपन्न सर्वज्ञ | परि मी न मनी तुजविण विष्णुदासा ॥१०॥
हे खूण जाणता एक पंढरीरावो | रुक्मादेवी नाहो श्रीविठ्ठल ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग