वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ऐका यमुने घोषा ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076365 · अभंग क्र. ५९५

595.
ऐका यमुने घोषा ।
उडाला पेंद्या कैसा ॥१॥
भरले अंगी वारे ।
हसती कैसी पोरे ॥२॥
ठेवुनि तीरी झारी ।
आली न म्हणे पोरी ॥३॥
बाहे पिटी मांडी ।
वरी सोस धरी तोंडी ॥४॥
घेवुनि हाती काटे ।
हुंबरी घाली नेटे ॥५॥
मज पेंद्याचा वार ।
येथे कोण धरी धीर ॥६॥
आली म्हणे पोरी ।
करीन तुज नवरी ॥७॥
लाविला मज चाळा ।
फोडीन तुझा डोळा ॥८॥
घाली पेंद्या वार ।
यमुना नव्हे स्थिर ॥९॥
उडत कसा फोडी ।
खरेसी आली जोडी ॥१०॥
सोस कंठी राहे ।
हुंकार न सांडी पाहे ॥११॥
यमुना नव्हे स्थिर ।
पडिला धरणीवर ॥१२॥
धांवोनी आला हरी ।
पेंद्या धरिला दो करी ॥१३॥
यमुना केली स्थिर ।
म्हण म्हणे आता किर्र ॥१४॥
घेतली आळी मोठी ।
यमुना जाली खोटी ॥१५॥
राहिला यमुनेचा घोष ।
सोडिला पेंद्याने सोस ॥१६॥
आली म्हणे पोरी ।
थोपटी कैसा टिरी ॥१७॥
बहिणि हुंबरी गाय ।
नाचत पंढरीराय ॥१८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग