हरी वासुदेव द्वारासी
596.
हरी वासुदेव द्वारासी आला ।
कोणी तरी भिक्षा त्यासी घाला गा॥धृ॥
कर्म करूनि फळ अल्पवी ।
अहंभावासी येवू न द्यावे ।
मूळ नासता ते ऋणी त्याचे ।
सर्व संचित पायी लावा गा ॥१॥
फावे लक्षअलक्ष याही वेगळे ।
ध्याये ध्यनाहुनी निराळे ।
दृश्य द्रष्टा दर्शन येथे गेले ।
तेचि दाता दिले पाहिजे गा ॥२॥
बहिणी म्हणे सरले द्वैत ।
सच्चिद्घने आनंद भरित ।
जेथे वेदाचा न कळे प्रांत ।
तया दानाचे आम्ही अंकित गा ॥३॥
