तोवरी रे तोवरी वैराग
29.
तोवरी रे तोवरी वैराग्याचे ठाण । जव कामिनी कटाक्ष बाण लागले नाही ॥१॥
तोवरी रे तोवरी आत्मज्ञान बोध । जोवरी अंतरी काम क्रोध उठले नाही ॥२॥
तोवरी रे तोवरी निराभिमान । जव देही अपमान झाला नाही ॥३॥
नामा म्हणे अवघी बचबच गाळी । विरळा तो जाळी व्दैत बुद्धी ॥४॥
