धन्य तोची देश जेथे स
28.
धन्य तोची देश जेथे संतवास । तापत्रय दोष जाती सत्य ॥१॥
धन्य माता पिता उभय कुळ शुद्धता । तोचि भजे संता निर्धारेसी ॥२॥
तीर्थ रुपी जळ विलंबे करी निर्मळ । संत दर्शने तात्काळ शुद्ध होती ॥३॥
धातुमय मूर्ती चिरकाळे फळती । संताचे संगती निजस्वार्थ ॥४॥
नामा म्हणे मुक्ती जे नर इच्छिती । संताचे संगती धरती भाव ॥५॥
