वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

सावध पाहता तुम्ही ज्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087870 · अभंग क्र. ३२३३

3233.
सावध पाहता तुम्ही ज्ञानाचें अज्ञान । मानूं तोचि म्हणे महंता महाधन ॥१॥
ज्ञानाचें अज्ञान कवण ज्ञाता फेडी । अनुतापाची जंव जीवी नाही आवडी ॥२॥
नश्वर देह म्हणती ज्ञानेंच निंदिजे । तोचि देह घेउनी ज्ञातेपणे फुंजें ॥३॥
सच्चिदानंद माया या नांवे । याहुनी परती स्थिति ते ते ज्ञान जाणावें ॥४॥
एका जनार्दनी अनुतापाची गोडी । ज्ञानाज्ञानाची तोडोनि सांडिली बेडी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग