सुख सांगावे संतांपुढ
878.
सुख सांगावे संतांपुढे | जेणे सुख अधिक वाढे ॥१॥
आणिक न करावे शहाणे | प्रेम दिठावले झणे ॥२॥
खंडिता कल्पनेचा लाग | त्यासि असावा अनुराग ॥३॥
तोडिता वासनेचा तंतु | त्यासि असावा एकांतु ॥४॥
गिळी अहंतेचे बीज | त्याचे व्हावे चरणरज ॥५॥
नामा म्हणे त्याचे संगती | चित्ता आपोआप येईल निवृत्ती ॥६॥
